पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल ही युवा सलामी जोडी भारतीय संघासाठी ग्रहण ठरत आहे. कारण, आतापर्यंत पृथ्वी-मयांक या जोडी जेव्हा जेव्हा सलामीसाठी उतरलेत तेव्हा तेव्हा भारतीय संघाला पराभवाचा झटका बसला आहे. आकडेवारीवर नजर फिरवल्यास तुम्हाला याची प्रचितीही येईल. आतापर्यंत पृथ्वी-मयांक ही जोडी सहा सामन्यात भारतीय संघाकडून सलामीला आली आहे. तीन कसोटी सामन्यात तीन तर एकदिवसीय सामन्यात या जोडीनं भारतीय संघाकडून सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. यामधील सहाही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल यांनी भारतीय संघाकडून सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. या सर्व सामन्यात भारतीय संघाला पराभवाचं तोडं पाहावं लागलं होतं. आता ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्यातही भारतीय संघ पराभूत झाला आहे.

मयांकबरोबर सलामीला खेळताना गेल्या नऊ डावांत पृथ्वी शॉनं ०, ४, १४, ५४, १६, १४, ४०, २४, २० अशा धावा केल्या आहेत. तर मयांकनं ९, १७, ३, ७, ५८, ३४, १, ३, ३२ धावा केल्या आहेत. आकडेवारीवर नजर मारल्यास पृथी-मयांक ही जोडी गेल्या ९ डावांत अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.


मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात या जोडीला पुन्हा मैदानात उतरवलं जातेय की यामधील एका खेळाडूला आराम दिला जातो, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मात्र दोघांची सलामी जोडी भातीय संघाला आतापर्यंत तर फलदायी ठरली नाही.