News Flash

‘‘सचिननं मला सामना गंभीरतेनं खेळू नकोस असं सांगितलं होतं”

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईज अजमलचा धक्कादायक खुलासा

चॅरिटी सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकर

भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या क्षेत्रात ‘विक्रमादित्य’ म्हणून ओळखला जातो. अनेक गोलंदाजांची धुलाई करण्यात तो तरबेज होता. त्याच्या फलंदाजीमुळे अनेक जण भांबावत असत, पण त्याने एखाद्या गोलंदाजाला ‘सोपी’ गोलंदाजी करण्याचा सल्ला दिल्याचे आपण ऐकले नव्हते. पण, पाकिस्तानी गोलंदाजाने याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईज अजमलने सचिनबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. सचिनने मला सामना जास्त गंभीरतेने खेळू नकोस, असा सल्ला दिल्याचे अजमलने सांगितले. २०१४मध्ये एमसीसी आणि वर्ल्ड टेस्ट-११ यात झालेल्या सामन्यात सचिनने हे विधान केल्याचे अजमलने सांगितले आहे.

हा एक चॅरिटी सामना होता. यात सचिन तेंडुलकर, शेन वॉर्नसह अनेक दिग्गज खेळाडू खेळत होते. वर्ल्ड-११ संघात अ‍ॅडम गिलख्रिस्ट, वीरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन, युवराज सिंग, शाहिद आफ्रिदी आणि शेन वॉर्न असे खेळाडू खेळले. त्याचवेळी एमसीसीमध्ये ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सईद अजमलसारखे दिग्गज होते. सामन्यात वर्ल्ड-११ने प्रथम फलंदाजी केली. यात सईद अजमलने त्याच्या पहिल्या चार षटकांत चार बळी घेतले. यामुळे वर्ल्ड-११ची धावसंख्या १२ षटकांत ५ बाद ६८ धावा अशी झाली. या दरम्यान सचिन तेंडुलकर आणि सईद अजमल यांच्यात संवाद झाला.

हेही वाचा – ‘‘देशाकडून खेळण्यासाठी माझ्या कातडीचा रंग योग्य नाही, असं मला सांगण्यात आलं”

 

क्रिकेट पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीत सईद अजमलने सांगितले, ”सचिन माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला, सईद भाई तुम्ही हा सामना इतक्या गंभीरपणे खेळू नये. ही चॅरिटी मॅच आहे. येथे मजा करण्यासाठी आलेल्या लोकांसाठी हा सामना आहे. हे लोक खातील-पितील. हा सामना संध्याकाळी ६.३० पूर्वी संपू नये.”

हेही वाचा – KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार

सईद अजमलन म्हणाला, ”मी सकारात्मक मार्गाने गोलंदाजी करत असल्याचे मी सचिनला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, मी तुमच्याशी सहमत आहे ,पण जर ही चॅरिटी मॅच असेल, तर निधी जमा करावा लागेल. तर क्रिकेट खेळा आणि मजा करा.” युवराज सिंगच्या १३२ धावांच्या मदतीने वर्ल्ड-११ने प्रथम खेळताना ७ गडी राखून २९३ धावा केल्या. परंतु एमसीसीकडून आरोन फिंचने १४५ चेंडूत १८१ धावांची मोठी खेळी खेळली. संघाने लक्ष्य ४५.५ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 9:18 am

Web Title: when sachin tendulkar asked saeed ajmal to not play too seriously adn 96
Next Stories
1 आजीवन बंदी उठवण्यासाठी अंकितची ‘बीसीसीआय’कडे विचारणा
2 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, नदाल विजयी
3 उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरण : भारतीय कुस्ती महासंघाला सुमितमुळे १६ लाखांचा दंड
Just Now!
X