News Flash

Video : घडू नये ते घडले! वसीम अक्रमने टाकलेला चेंडू थेट फलंदाजाच्या…

एकदा नव्हे तर सलग दोन चेंडूंवर घडला हा प्रकार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने कायमच पाहण्यासारखे असतात. या सामन्यांना ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ म्हटलं जातं, कारण एकंदर राजकीय आणि इतर परिस्थिती पाहता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने म्हणजे स्वाभिमानाची लढाई असल्याप्रमाणेच खेळाडू खेळतात आणि चाहतेही तहानभूक हरपून टीव्हीला चिकटून बसतात. काही दिवसांपूर्वी भारत-पाक क्रिकेट मालिका भरवण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानात जोर धरू लागली होती. या मागणीला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यानेही पाठिंबा दिला होता. पण आता तो एका वेगळ्या मुद्द्यावरून चर्चेत आहे.

वसीम अक्रमने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १९८९-९०च्या क्रिकेट सामन्याचा आहे. पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात त्यावेळी रोशन महानामा फलंदाजी करत होता. वसीम अक्रमने टाकलेला चेंडू गोलंदाजी करताना चक्क रोशन महानामाच्या लागू नये अशा ठिकाणी जाऊन लागला. हा प्रकार फक्त एकदा नव्हे, तर सलग दोन चेंडूंवर दोनदा घडला. त्यानंतर महानामाला कळवळत मैदान सोडावे लागले होते.

अक्रमने हा व्हिडीओ पोस्ट करत रोशन महानामाची माफी मागितली आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात असेही त्याने कॅप्शनमध्ये लिहिले.

IPL आणि PSL तुलनेबद्दल अक्रमने व्यक्त केलं होतं मत

“IPL आणि PSLमध्ये खूप फरक आहे. गेल्या पाच-सहा वर्षात या दोन स्पर्धांमध्ये खूपच तफावत जाणवू लागली आहे. IPLमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला जातो. एका संघाचं बजेट ६० ते ८० कोटी इतकं असतं. म्हणजे PSLच्या अंदाज दुप्पट… त्यामुळे त्यातून होणारा नफादेखील जास्त असतो. तोच आर्थिक नफा BCCI देशांतर्गत स्पर्धांसाठी वापरते. म्हणूनच IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे”, असे वसीम अक्रम म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 11:53 am

Web Title: when wasim akram hit batsman roshan mahanama in the box twice in two balls see video tweet vjb 91
Next Stories
1 रोहित शर्माचा पहिला चेक किती रुपयांचा होता माहिती आहे?
2 वयचोरीच्या कबुलीला माफी!
3 द्रविड ‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाचा प्रमुख?
Just Now!
X