News Flash

कुठून आणता रे असल्या खेळाडूंना? जेव्हा गांगुली भर मैदानात दिनेश कार्तिकवर भडकतो…

संधी साधत युवराजनेही केलं कार्तिकला ट्रोल

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला मैदानात आक्रमक पद्धतीने खेळायला शिकवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान यासारख्या आक्रमक संघांसमोर सौरव गांगुलीने तितक्याच जोरदार पद्धतीने भारताचं नेतृत्व केलं होतं. कित्येकदा सौरव गांगुलीचा हा आक्रमक स्वभाव आपण सामन्यादरम्यान पाहिला आहे. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकलाही सौरव गांगुलीच्या या आक्रमक स्वभावाचा सामना करावा लागला होता. प्रसिद्ध निवेदक गौरव कपूर याच्या ‘Breakfast with Champions’ या कार्यक्रमात दिनेशने हा प्रसंग सांगितला.

“२००४ साली चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान मी भारतीय संघाचा भाग होतो. त्यावेळी मला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती आणि राखीव खेळाडू असल्यामुळे मी इतरांसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात जायचो. एका क्षणाला मैदानात जात असताना मी अचानक सौरव गांगुलीच्या अंगावर जाऊन धडकलो, त्यावेळी आधीच संतापलेल्या गांगुलीने माझ्याकडे पाहून, कोण आहे हा? कुठून आणता असल्या खेळाडूंना इथे? असं वक्तव्य केलं.” गौरव कपूरशी बोलत असताना दिनेश कार्तिकने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने संधी साधत सोशल मीडियावर दिनेश कार्तिकला ट्रोल केलं आहे.

याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मोहम्मद युसूफच्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ३ गडी राखत सामन्यात बाजी मारली होती. सौरव गांगुली आणि युवराज सिंह या सामन्यात भोपळा ही न फोडता माघारी परतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 5:51 pm

Web Title: where do you get these players from yuvraj singh reveals hilarious episode between sourav ganguly and dinesh karthik psd 91
Next Stories
1 Ind vs SA : भारताला धक्का,जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर; उमेश यादवला संधी
2 BCCI ची सार्वत्रिक निवडणूक २३ ऑक्टोबरला – विनोद राय
3 Video : भर मैदानात चाहतीनं पंतला सांगितली ‘दिल की बात’ अन्…
Just Now!
X