भारताच्या १९ वर्षाखालील संघाने बे ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलियन संघाचा आठ गडी राखून पराभव करत चौथ्यांदा विश्वचषक जिंकला. २००० साली मोहम्मद कैफ, २००८ साली विराट कोहली, २०१२ साली उन्मुक्त चंद आणि आता पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली पुन्हा भारतीय संघाने हा पराक्रम केला. या विजयाबरोबरच चार वेळा १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक अर्थाने हा विजय महत्वाचा आहे. म्हणूनच या विजयानंतर अगदी राष्ट्रपतींपासून अनेक आजी-माजी खेळाडूंनेही भारतीय संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले या ऐतिहासिक विजयानंतर…

राष्ट्रपती म्हणाले आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

पंतप्रधान म्हणतात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय

सेहवाग म्हणतो सर्व श्रेय द्रविडचे

परदेशी खेळाडूही या भारतीय संघाच्या प्रेमात

देशासाठी अभिमानाचा क्षण