30 October 2020

News Flash

World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा तरी का करायची? जावेद अख्तर धोनीच्या पाठीशी

धोनी संघातला सर्वात अनुभवी खेळाडू !

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, पराभवाची जबाबदारी कोणी घ्यायची यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी विश्वचषकानंतरही खेळणार की निवृत्ती स्विकारणार याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. विश्वचषक स्पर्धेत आपल्या संथ खेळीमुळे धोनीला टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी धोनीला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

अख्तर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन, धोनीची पाठराखण करत धोनी भारतीय संघातला सर्वात विश्वासू खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. कर्णधार विराटनेही धोनीचं संघातलं महत्व मान्य केलं असल्याचं, जावेद अख्तर म्हणाले आहेत.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्विकारणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. खुद्द कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यानंतर पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली होती.

अवश्य वाचा – World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रीयेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 11:18 am

Web Title: why even talk about ms dhoni retirement javed akhtar hits out at critics psd 91
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 World Cup 2019 : तुमचा कायम ऋणी राहीन, मोहम्मद शमीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार
2 World Cup 2019 : उपांत्य सामन्यात वादग्रस्त निर्णय देणाऱ्या पंचांना अंतिम सामन्यात संधी
3 World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रियेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद
Just Now!
X