विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, पराभवाची जबाबदारी कोणी घ्यायची यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी विश्वचषकानंतरही खेळणार की निवृत्ती स्विकारणार याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. विश्वचषक स्पर्धेत आपल्या संथ खेळीमुळे धोनीला टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी धोनीला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अख्तर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन, धोनीची पाठराखण करत धोनी भारतीय संघातला सर्वात विश्वासू खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. कर्णधार विराटनेही धोनीचं संघातलं महत्व मान्य केलं असल्याचं, जावेद अख्तर म्हणाले आहेत.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्विकारणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. खुद्द कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यानंतर पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली होती.

अवश्य वाचा – World Cup 2019 : टीम इंडियामध्ये गटबाजी? निर्णय प्रक्रीयेवरुन विराट-रोहितमध्ये मतभेद

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why even talk about ms dhoni retirement javed akhtar hits out at critics psd
First published on: 13-07-2019 at 11:18 IST