भारतीय क्रिकेटची धुरा महेंद्रसिंग धोनीकडून विराट कोहलीकडे सोपवताना झालेल्या यशस्वी परिवर्तनाचा अभिमान वाटतो, असे भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचे मावळते अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले होते. BCCI ने प्रसाद यांना मुदतवाढ नाकारल्यानंतर त्यांनी मार्च २०२० मध्ये अध्यक्षपदाचा पदभार सोडला. भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज सुनिल जोशी यांनी त्यांच्या जागी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. पदभार सोडल्यानंतर एमएसके प्रसाद फारसे चर्चेत नव्हते, पण आता ते एका मुद्द्यावरून चर्चेत आले आहेत.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

गेल्या काही दिवसात करोना लॉकडाउनमुळे क्रिकेटपटू आणि क्रिकेटशी संबंधित सहकारी लाईव्ह चॅटद्वारे जगाशी संपर्क साधत आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी एका चॅटमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना याने निवड समितीवर टीका केली होती. ‘संघाची निवड करताना निवड समितीने ज्येष्ठ खेळाडूंचा नीटपणे विचार करावा’, असा सल्ला त्याने दिला होता. त्यावर प्रसाद यांनी उत्तर दिले आहे. “रैनाने मधल्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली नाही. त्यामुळे त्याचा टीम इंडियासाठी विचार करण्यात आला नाही. व्ही व्ही एस लक्ष्मणसारख्या खेळाडूकडे बघा. त्याला जेव्हा संघातून वगळण्यात आले होते. तेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करणे सोपे गेले. पण रैनाच्या बाबतीत तसे घडले नाही. त्यामुळे दुर्दैवाने त्याला संघात घेण्याचा विषय झाला नाही आणि तो अजूनही संघाबाहेर आहे.”, असे प्रसाद यांनी फॅनकोडला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

“…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात”

लोकेश राहुलमुळे धोनीपुढील पेच वाढला असेही ते म्हणाले. “IPL स्पर्धा झाली असती, तर आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा धोनीचे चपळ यष्टीरक्षण आणि तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली असती. पण आता करोनामुळे ते शक्य झालं नाही. तशातच आता लोकेश राहुलही यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी करताना दिसला. न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत त्याची झलक पाहायला मिळाली. त्यामुळे अशा परिस्थीतीत धोनीचे पुनरागमन जरा कठीणच आहे”, असे प्रसाद यांनी सांगितले.

“क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय धोनीचाच”

“मी अतिशय स्पष्टपणे धोनीला विचारलं होतं. आम्ही चर्चा केली होती. त्यानेच मला सांगितलं की मला काही दिवस क्रिकेटपासून दूर राहायचं आहे. त्यामुळे आम्ही धोनीशिवाय संघ निवड करायला सुरूवात केली. त्यावेळी मग आम्ही ऋषभ पंतला प्राधान्य दिले आणि त्याला पाठींबा दिला”, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.