09 August 2020

News Flash

डी व्हिलियर्सला निवृत्ती मागे घेण्यासाठी विचारेन -बाऊचर

डी व्हिलियर्स हा आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकीच एक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर संघाची नव्याने संघबांधणी करण्याच्या हेतूने एबी डी व्हिलियर्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी विचारेन, अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने व्यक्त केली.

४३ वर्षीय बाऊचरची शनिवारी आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणीला सुरुवात केली आहे.

‘‘विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंची आवश्यकता असते. डी व्हिलियर्स हा आफ्रिकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकीच एक आहे. त्यामुळे मी त्याला नक्कीच निवृत्ती मागे घेण्यासाठी विचारणा करेन. डी व्हिलियर्सव्यतिरिक्त अन्य काही खेळाडूंशी संवाद साधूनही त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी मी जाणून घेणार आहे,’’ असे बाऊचर म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2019 1:33 am

Web Title: will ask de villiers to retire abn 97
Next Stories
1 Video : थेट मैदानाबाहेर, हेटमायरच्या फटकेबाजीसमोर विराट कोहलीही हतबल
2 IND vs WI : हेटमायरच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाज निष्रभ, मैदानाच्या चौफर फटकेबाजी
3 सम्मेद शेटे बनला कोल्हापूरचा पहिला बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर
Just Now!
X