27 February 2021

News Flash

धोनी टी २० विश्वचषक खेळणार? सौरव गांगुली म्हणतो…

विश्वचषक २०१९ नंतर धोनी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. आगामी टी २० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो असे सांगण्यात येत आहे. तशातच २०२० मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का या प्रश्नावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने उत्तर दिले आहे.

 

२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर धोनीने २ महिन्याची विश्रांती घेतली. भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दौऱ्यातून माघार घेतली होती. त्या काळात तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा दिली आणि सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. त्यानंतर धोनी मैदानावर परतणार असे वाटत असतानाच तो आणखी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात आले.

सध्या भारतीय संघातील खेळाडूंची टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी चाचपणी सुरू आहे, ऋषभ पंत हा फारशी चांगली कामगिरी अद्याप करू शकलेला नाही. त्यामुळे संजू सॅमसन याचाही पर्याय चाचपण्यात येताना दिसतो आहे. पण या साऱ्या चर्चांमध्ये भारताचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या स्पर्धेत खेळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्ष सौरव गांगुली याला विचारण्यात आले. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर ‘तुम्ही धोनीलाच विचारा’ असं सूचक वक्तव्य गांगुलीने केले. त्यापेक्षा अधिकचे काहीही बोलणे धोनीने टाळले.

दरम्यान, निवड समितीने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी यष्टीरक्षक म्हणून धोनीऐवजी ऋषभ पंतला पहिली पसंती देण्याचे ठरवले आहे. याबाबत धोनीलाही पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे त्यानुसारच संघ व्यवस्थापन आपला निर्णय घेईल असे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 12:13 pm

Web Title: will dhoni play in t20 world cup 2020 sourav ganguly opens up with reaction vjb 91
Next Stories
1 Aus vs Pak : पॅट कमिन्सची धडाकेबाज कामगिरी, झळकावलं अर्धशतक
2 वॉर्नरची स्तुती करताना त्याच्या पत्नीला आठवला महात्मा गांधींचा संदेश
3 U-19 World Cup – मुंबईच्या अथर्व अंकोलेकरला भारतीय संघात स्थान
Just Now!
X