05 March 2021

News Flash

सायना-सिंधू आमनेसामने

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व युवा खेळाडू पी. व्ही. सिंधू यांच्यात सय्यद मोदी चषक ग्रां. प्रि. बॅडिमटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गाठ पडणार आहे.

| January 26, 2014 05:31 am

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व युवा खेळाडू पी. व्ही. सिंधू यांच्यात सय्यद मोदी चषक ग्रां. प्रि. बॅडिमटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गाठ पडणार आहे.
सायनाने चीनच्या झुआन देंग हिच्यावर २१-१४, १७-२१, २१-१९ असा रोमहर्षक विजय मिळविला. सिंधू हिने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्री हिच्यावर २१-६, १२-२१, २१-१७ असा निसटता विजय मिळविला. सायना व सिंधू यांच्यात भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये दोन वेळा गाठ पडली होती. त्या वेळी दोन्ही वेळा सायनाने सिंधूला हरविले होते.
पुरुषांच्या उपांत्य लढतीत किदम्बी श्रीकांतने सहकारी एच. एस.प्र णय याच्यावर २१-१८, २२-२० अशी मात केली. अन्य लढतीत, चीनच्या झुई सोंग या नवव्या मानांकित खेळाडूने भारताच्या आदित्य प्रकाश या उदयोन्मुख खेळाडूवर २१-१०, २१-७ अशी लीलया मात केली.  
सायना व देंग यांच्यातील सामना अतिशय रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला. सायनाने सव्‍‌र्हिस व प्लेसिंग यावर चांगले नियंत्रण राखले. दुसऱ्या गेममध्ये तिच्या चुकांचा फायदा देंग हिला मिळाला. ही गेम घेत देंगने सामन्यात उत्सुकता निर्माण केली. तिसऱ्या गेममध्ये सायना सुरुवातीस ०-७ अशी पिछाडीवर होती. तथापि तिने सुरेख खेळ करीत ८-८ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायनाने आघाडी घेतली व शेवटपर्यंत टिकवित सामना जिंकला.
पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या प्रणव चोप्रा व अक्षय देवलकर यांचे आव्हान संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 5:31 am

Web Title: will give my best against saina nehwal pv sindhu
टॅग : Pv Sindhu,Saina Nehwal
Next Stories
1 सावळागोंधळ!
2 अशी ही बरोबरी!
3 लिएण्डर पेस, गोपीचंद यांना पद्मभूषण
Just Now!
X