08 March 2021

News Flash

तुमच्या नियमाप्रमाणे काम करेन, समालोचनाची संधी द्या ! संजय मांजरेकरांची BCCI ला विनंती

काही महिन्यांपूर्वीच BCCI ने मांजरेकरांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवलं

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर नेहमी आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा सोशल मीडियावर आणि समालोचन करत असताना एखाद्या मुद्द्यावर मांडत असलेल्या मतांमुळे मांजरेकर यांना अनेकांच्या टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बीसीसीआयने मांजरेकरांना आपल्या कॉमेंट्री पॅनलमधून हटवलं होतं. बीसीसीआयने याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही बीसीसीआयमधील काही अधिकारी हे मांजरेकरांवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. या मालिकेसाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये मांजरेकर यांची निवड करण्यात आलेली नव्हती.

बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीत आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमध्ये समालोचन करण्याची संधी मिळावी यासाठी मांजरेकर यांनी बीसीसीआयला इ-मेल द्वारे विनंती केल्याचं समजतंय. “बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीतील सदस्यांना माझा नमस्कार, आशा आहे तुम्ही सर्व ठीक असाल. समालोचक म्हणून माझी बाजू मांडणारा इ-मेल मी तुम्हाला याआधी पाठवला आहे. आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे बीसीसीआय लवकरच आपलं कॉमेंट्री पॅनल अंतिम करणार आहे. मी तुम्ही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काम करायला तयार आहे. कितीही झालं तरीही आपण सर्व एकाच गोष्टीसाठी काम करत आहोत.” मांजरेकर यांनी आपल्या इ-मेलमध्ये बीसीसीआयला अशी विनंती केल्याचं समजतंय.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यानही मांजरेकर यांनी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना उद्देशून अपमानजनक वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर सोशल मीडियावर मांजरेकरांविरोधात नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. टाइम्सनेच दिलेल्या वृत्तानुसार भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सुनील गावसकर आयपीएलमध्ये समालोचनासाठी युएईला जाणार आहेत. त्यामुळे मांजरेकरांच्या विनंतीवर बीसीसीआय काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 4:33 pm

Web Title: will work as per guidelines says sanjay manjrekar requests bcci to reinstate him in commentary panel for ipl 13 psd 91
Next Stories
1 विराटला अटक करा; न्यायालयात याचिका दाखल
2 IPLची पाकिस्तान सुपर लीगशी तुलना केल्यास… – वासिम अक्रम
3 हार्दिक-नताशाला सचिनच्या खास शुभेच्छा, म्हणाला…
Just Now!
X