काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विम्बल्डन या मानाच्या ग्रँड स्लॅम पुरुष एकेरीचं विजेतेपद सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पटकावलं. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतीलं हे १३ वं ग्रँडस्लॅम ठरलं आहे. या विजयानंतर नोव्हाकवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्य म्हणजे ज्यावेळी त्याने यंदाच्या विम्बल्डनचं जेतेपद मिळवलं तेव्हाही सेंटर कोर्टवर अनेकांचाच उत्साह शिगेला पोहोचला होता. उपस्थितांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात होता.

विम्बल्डनची ट्रॉफी स्वीकारतेवेळी नोव्हाकच्या चेहऱ्यावरुनही हा आनंद लपून राहिलेला नव्हता. या साऱ्यामध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे नोव्हाकच्या मुलाने. आपल्या वडिलांचा अंतिम सामन्यातील खेळ पाहण्यासाठी त्याचा लहान मुलगाही सेंटर कोर्टवर आला होता. नोव्हाकच्या पत्नीचीही यावेळी उपस्थिती होती. आपल्या आप्तजनांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हणत नोव्हाकही त्यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘प्रेक्षकांच्या या गर्दीत बाबा- बाबा म्हणून आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या या चिमुरड्याची उपस्थिती माझ्यासाठी खूपच महत्त्वाची ठरली’, असं म्हणज त्याने आपला आनंद व्यक्त केला. विम्बल्डच्या फेसबुक पेजवरुन याविषयीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. मुख्य म्हणजे नोव्हाकने ती मानाची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर जेव्हा त्यांने आभार व्यक्त करण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच आपल्या मुलाविषयीच्या भावनांना वाट मोकळी करुन देत हा जिंकलेला बाबा सर्वांची मनं जिंकून गेला.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

दरम्यान, नोव्हाकने विम्बल्डन २०१८च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात केविन अँडरसनचा ६-२, ६-२, ७-६ (७-३) अशा सेटमध्ये पराभव केला. या संपूर्ण सामन्यावर सुरुवातीपासून नोव्हाकची पकड पाहायला मिळाली होती.