20 October 2020

News Flash

Wimbledon 2019 : जोकोव्हिच अंतिम फेरीत; रॉबेर्टोला केले पराभूत

चार सेटमध्ये केला पराभव

यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच याने २३ व्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला ६-२, ४-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जोकोव्हिचने पहिला सेट ६-२ असा अत्यंत शिताफीने जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये रॉबेर्टोने दमदार पुनरागमन केले. त्याने तो सेट ४-६ असा खिशात घातला. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. पण जोकोव्हिजन अनुभवाच्या जोरावर पुढील दोनही सेट जिंकून सामन्यात विजय मिळवला.

अंतिम सामन्यात जोकोव्हिचची झुंज राफेल नदाल किंवा रॉजर फेडरर यांच्यात होणार आहे. फेडरर आणि नदाल यांच्यात बरेच वर्षांनी सामना होणार आहे.फेडरर आणि नदाल यापूर्वी २००८ मध्ये अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यानंतर प्रथमच विम्बल्डनमध्ये हे दोघे आमनेसामने येणार असल्यामुळे या सामन्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. विम्बल्डनच्या अधिकृत ट्विटर संकेतस्थळानेसुद्धा २००८ मधील या दोन्ही खेळाडूंचा चषकासह छायाचित्र टाकून जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००८ मध्ये चार तास आणि ४८ मिनिटे रंगलेल्या त्या अंतिम लढतीत नदालने फेडररला ६-४, ६-४, ६-७ (५-७), ६-७ (८-१०), ९-७ असे पाच सेटमध्ये नमवले होते. या सामन्यापूर्वी फेडररने सलग दोन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 8:52 pm

Web Title: wimbledon 2019 semi final novak djokovic roberto bautista agut final vjb 91
Next Stories
1 WC 2019 मधील खराब कामगिरीनंतर २० वर्षाच्या खेळाडूकडे ‘या’ संघाचे नेतृत्व
2 ‘भारताशी हरल्यानंतर माझ्या नावाचा बोभाटा’; ABD चा खुलासा
3 WC 2019 : स्पर्धेतील कामगिरीबद्दल BCCI विचारणार विराट, रवी शास्त्रींना जाब
Just Now!
X