04 March 2021

News Flash

….म्हणून दुसऱ्या कसोटीतला विजय विराटसाठी आहे खास, जाणून घ्या कारण

विराटच्या नेतृत्वाखाली भारताचं विंडीज दौऱ्यात वर्चस्व

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. टी-२०, वन-डे पाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताने यजमान वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. किंग्जस्टन, जमैकाच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८ वा विजय ठरला आहे. याआधी धोनीने भारताला २७ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. विराटने धोनीचा हा विक्रम आता आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीसाठी भारतीय संघाचा हा विजय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. २०११ साली याच मैदानावर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच मैदानावर तब्बल ८ वर्षांनी विराट भारताचा कसोटी क्रिकेटमधला यशस्वी कर्णधार ठरला आहे. किंग्जस्टनच्या मैदानावर विराट कोहलीने पहिल्या डावात ७६ धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नाही.

माजी कर्णधार धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताला २७ सामने जिंकून दिले होते. कोहलीने ४८ व्या सामन्यात २८ वा विजय साजरा करत नवा विक्रम नावे केला आहे. विराट कोहली आशिया खंडातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. याशिवाय ४८ सामन्यात सर्वात कमी पराभाव विराट कोहलीने पाहिले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत फक्त दहा सामने गमावले आहेत. २०१४ मध्ये विराट कोहलीने भारतीय संघाची सुत्रे सांभाळली होती. या विजयासह भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकूण १२० गुण झाले आहेत. गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:27 pm

Web Title: win against west indies in 2nd test special for captain virat kohli know reason here psd 91
टॅग : Ind Vs WI,Virat Kohli
Next Stories
1 कसोटी क्रिकेटमधली जसप्रीत बुमराहची ही कामगिरी पाहून तुम्हीही थक्क व्हाल !
2 IPL : पंजाबनंतर आता अश्विन ‘या’ संघातून खेळणार
3 मिस्बाह-उल-हक पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक
Just Now!
X