News Flash

आईच्या निधनाचं दुःख विसरुन तो मैदानात उतरला, विंडीजच्या खेळाडूचं सर्वत्र कौतुक

4 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान

विंडीजने अँटीग्वा कसोटीत इंग्लंडवर 10 गडी राखून मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. मात्र या सामन्यात विंडीजचा जलदगती गोलंदाज अल्झारी जोसेफने आपल्या खेळाप्रती दाखवलेल्या निष्ठेबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाआधी अल्झारीला आपल्या आईच्या निधनाची बातमी समजली. मात्र हे दुःख विसरुन त्याने संघासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

अल्झारी जोसेफ मैदानात उतरल्यावर मैदानात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी उभं राहुन त्याचं कौतुक केलं. विंडीजच्या खेळाडूंनीही आपल्या दंडाला काळी पट्टा बांधून आपल्या सहकाऱ्याच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विंडीजचे माजी खेळाडू इयन बिशॉप यांनीही तिसऱ्या दिवशी खेळ सुरु होण्याआधी अल्झारीशी संवाद साधत त्याचं सांत्वन केलं.

दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात जोसेफने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जोसेफने दोन्ही डावात मिळून इंग्लंडचे 4 फलंदाज माघारी धाडले.

अवश्य वाचा – घरच्या मैदानावर विंडीजची सरशी, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडवर मात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 9:51 am

Web Title: windies paceman joseph bats just hours after death of his mother
Next Stories
1 घरच्या मैदानावर विंडीजची सरशी, दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडवर मात
2 अखेरच्या सामन्यात भारताची बाजी, मालिकेवरही 4-1 ने कब्जा
3 भारताच्या फलंदाजीला धोनीचा दिलासा
Just Now!
X