आगामी टोक्यो ऑलिम्पिकमधील स्पर्धा करणे सोपे होणार नाही कारण महिला एकेरीतील सर्व अव्वल १० खेळाडू एकसारखे आहेत. त्यांच्या कामगिरीने आश्चर्यचकित करण्यात ते सक्षम आहेत, असे रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू ने सांगितले.

सिंधूने गुरुवारी वर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, “टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी कोणत्याही प्रकारच्या आव्हाणासाठी तयार आहे. महिला एकेरीतील सर्व प्रमुख खेळाडू समान क्षमता असनारे आहेत. त्यामुळे पोडियम फिनिश मिळवणे सोपे होणार नाही.”

नवीन कौशल्ये व तंत्रे शिकण्याची संधी

सिंधू ही एकमेव महिला बॅडमिंटनपटू आहे जीने महिला एकेरी गटात टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. ती म्हणाली, “करोना महामारीमुळे होणारी स्पर्धा रद्द झाल्यानंतर मोकळ्या वेळेमुळे तीला नवीन कौशल्ये व तंत्रे शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.”

“मी लक्ष केंद्रित करीत आहे आणि सर्व कठोर परिश्रमांमुळे मला जपानमधील माझ्या विरोधकांशी सामना करण्यास सक्षम केले जाईल,” असे सिंधू म्हणाली.