30 September 2020

News Flash

नागपूरचा विजयी धडाका; कोल्हापूरला संमिश्र यश

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि कोल्हापूर संघांनी आपला विजयी धडाका कायम ठेवला. यजमान मुंबईसाठी शनिवार संमिश्र यशाचा ठरला.

| March 31, 2013 02:12 am

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि कोल्हापूर संघांनी आपला विजयी धडाका कायम ठेवला. यजमान मुंबईसाठी शनिवार संमिश्र यशाचा ठरला.
वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यात काल चार-चार विजयांची नोंद करणाऱ्या कोल्हापूरला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. मुलींच्या १८ वर्षांखालील गटात मुंबईचा २५-३,२५-१० व २५-१२ असा धुव्वा उडवल्यानंतर त्यांच्या १८ वर्षांखालील मुलांना अमरावतीकडून  ३०-३२, २५-२२,२५-२०,१८-२५ आणि १५-९ अशी हार सहन करावी लागली. मात्र अमरावतीला नाशिककडून २५-१३,२५-४ आणि २५-७ असा मार खावा लागला. पुण्याने लातूरवर २५-६,२५-४, २५-७ असे हरवले. त्यानंतर २१ वर्षांखालील युवतींच्या गटात कोल्हापूरने लातूरवर २५-११,२५-१० आणि २५-८ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:12 am

Web Title: winning bang of nagpur kolhapur got mixed success
टॅग Sports
Next Stories
1 मरे, फेरर अंतिम फेरीत
2 गंभीर तंदुरुस्त; रविवारी संघात दाखल होणार
3 संघटकांचीच अग्निपरीक्षा!
Just Now!
X