स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ भक्कम आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिके त विजय मिळवणे सोपे नसेल, असे मत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. भारताचा दर्जेदार गोलंदाजीचा मारा २०१८-१९च्या यशाची पुनरावृत्ती करील, असा विश्वास मात्र त्याने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियातील मागील कसोटी मालिकेच्या यशात पुजाराचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने तीन शतकांसह पाचशेहून अधिक धावा के ल्या होत्या. त्यामुळेच भारताला ७१ वर्षांनंतर प्रथम ऑस्ट्रेलियातील मालिका २-१ अशी जिंकता आली होती. त्या मालिके त चेंडू फेरफार प्रकरणी बंदी घालण्यात आल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर खेळले नव्हते.

‘‘२०१८-१९पेक्षा सध्याची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची फळी अधिक भक्कम आहे. त्यामुळेच विजयाचे समीकरण सोपे नसेल. परंतु परदेशात विजय मिळवायचा असेल, तर अधिक मेहनत घ्यावी लागते, हे अनुभवातून मी शिकलो आहे,’’ असे पुजाराने सांगितले.

जसप्रित बुमरा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश असलेला भारताचा वेगवान मारा २०१८-१९प्रमाणेच जादुई कामगिरी करतील आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवतील, असा विश्वास पुजाराने व्यक्त के ला.

या कसोटी मालिके ला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. अ‍ॅडलेड येथे प्रकाशझोतात पहिला कसोटी सामना गुलाबी कु काबुरा चेंडूने खेळवण्यात येणार आहे. ‘‘गुलाबी चेंडूनिशी प्रकाशझोतात खेळण्याचे आव्हान वेगळे असेल. कारण चेंडूचा वेग आणि उसळी बदलते. बांगलादेशविरुद्ध आम्ही गुलाबी एसजी चेंडूने खेळलो होतो. आता गुलाबी कु काबुरा चेंडूचे आव्हान आमच्यापुढे असेल,’’ असे पुजाराने सांगितले. पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यांत १८ शतकांसह एकू ण ५८४० धावा केल्या असून, येत्या मालिके त तो सहा हजार धावांचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिके बाबत पुजारा म्हणाला, ‘‘सामने असे सहजासहजी जिंकले जात नाहीत. त्यासाठी अपवादात्मक कामगिरी करावी लागते. अन्य खेळाडूंचे सहकार्यही त्यासाठी तितकेच महत्त्वाचे असते.

‘‘ऑस्ट्रेलियामधील मागील यशात गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची होती. फक्त माझ्या एकटय़ाच्याच फलंदाजीच्या कामगिरीमुळे ते यश मिळाले नव्हते. अन्य फलंदाजांची साथही लागते. याचप्रमाणे कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी मिळवावे लागतात. ते सांघिक यश होते. त्यामुळेच अभिमानास्पद होते,’’असे पुजाराने सांगितले.

कमिन्सबाबत प्रश्नचिन्ह

सिडनी : तीन महिने जैव-सुरक्षित वातावरणात घालवल्यानंतर येत्या २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये खेळण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने म्हटले आहे. ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा कमिन्स गेल्या आठवडय़ात संयुक्त अरब अमिरातीमधून मायदेशी परतला आहे. भारताविरुद्धच्या मालिके संदर्भात मी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे त्याने सांगितले.