News Flash

All Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे; भारताच्या एकूण ४ खेळाडूंचा समावेश

विस्डनने तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा एक संघ बनवला आहे. त्या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे.

All Format Cricket Team चं कर्णधारपद विराट कोहलीकडे (Source: Reuters)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीसाठी शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला विस्डनच्या सध्याच्या पर्वातील ऑल फॉर्मेट प्लेइंग इलेवनचा कर्णधार बनवलं गेलं आहे. विस्डनने तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा एक संघ बनवला आहे. त्याचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० सामन्यात खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत. या तिन्ही फॉर्मेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या खेळाडूंची यात निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा दिसत आहे. टीम इंडियाच्या ४ खेळाडूंचा यात समावेश आहे. विस्डनच्या ऑल फॉर्मेट संघात भारताचे ४, इंग्लंडचे ३, न्यूझीलंडचे २, ऑस्ट्रलिया आणि आफगाणिस्तान संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. या संघात पाकिस्तानच्या एकही खेळाडूला स्थान मिळालेलं नाही.

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (भारत), रविंद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), जोस बटलर (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), केन विलियमसन (न्यूझीलंड), डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) आणि राशिद खान (आफगाणिस्तान) या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

WTC Final: विजेत्या संघाला मिळणार ११.७२ कोटीचं बक्षीस!

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा बीसीसीआयच्या ग्रेड A+ यादीत समावेश आहे. त्यांना वर्षाकाठी ७ कोटींची रक्कम मिळते. तर रविंद्र जडेजाचा ग्रेड A मध्ये समावेश आहे. त्याला वर्षाकाठी ५ कोटींची रक्कम मिळते.

Euro Cup 2020 : चेक रिपब्लिकच्या खेळाडूचा ‘खतरनाक’ गोल, गोलकीपरच घुसला जाळ्यात!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. या संघात विराट कोहलीसह, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहचा यांचा समावेश आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवून पहिला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप चषक जिंकण्याची संधी विराट सेनेकडे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 9:53 pm

Web Title: wisdens all format cricket team captainship towards virat kohali rmt 84
Next Stories
1 बॅडमिंटन क्षेत्र हादरलं! बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूचा मृत्यू
2 Euro Cup 2020: चेक रिपब्लिक संघाची विजयी सलामी; पॅट्रिकच्या २ गोलपुढे स्कॉटलँडची रणनिती फेल
3 Euro Cup 2020 : चेक रिपब्लिकच्या खेळाडूचा ‘खतरनाक’ गोल, गोलकीपरच घुसला जाळ्यात!
Just Now!
X