News Flash

विश्वनाथन आनंदची पराभवाने सुरुवात

स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर आनंदचे अडीच गुण झाले आहेत.

भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. भारताचा उदयोन्मुख खेळाडू विदित गुजराथी याने शानदार सुरुवात केली.

स्पर्धेतील पाचव्या फेरीअखेर आनंदचे अडीच गुण झाले आहेत. आनंदने रशियाच्या कॅटेरिनो लाग्नो व अ‍ॅलेक्झांडर ओनीशुक यांच्यावर मात केली मात्र त्याला ए.आर.सालेमविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. नाशिकचा खेळाडू विदित याने चार गुणांची कमाई केली आहे. त्याने पाचव्या फेरीत पीटर लेको याला बरोबरीत रोखले. त्याने द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक याच्यावर सनसनाटी विजय मिळविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 6:22 am

Web Title: wishwanath anand loose the match
Next Stories
1 भारताचा हॉकीमध्ये मालिका विजय
2 पेले आले हो..! कोलकातामध्ये माजी महान फुटबॉलपटूचे जल्लोषात स्वागत
3 विशेष खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक मिळेल -सोनवाल
Just Now!
X