News Flash

IND vs WI : शिखरचा पत्ता कट; रोहितचे पुनरागमन, पृथ्वीचे कसोटी पदार्पण?

इंग्लंडविरोधातील शेवटच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या राहुलची निवड निश्चित

आशिया चषक संपल्यानंतर सर्वांच्या नजरा वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात होणाऱ्या मालिकेवर खिळल्या आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळात होणाऱ्या या दौऱ्याची सुरुवात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकाने होणार आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यात मायदेशी होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, भारताला आशिया चषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्माला संधी देण्यात येणार आहे. तर मालिकावीर ठरलेल्या शिखर धवनचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरूद्धात केएल राहुल आणि युवा पृथ्वी शॉ सलामीवीराच्या भूमिकेत दिसू शकतात. आशिया चषकात रोहित शर्माने १०५ च्या सरासरीने ३१७ धावा कुटल्या आहेत.

इंग्लंडविरोधातील शेवटच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या राहुलची निवड निश्चित असल्याचे मानले जातेय. तर पृथ्वी शॉ वेस्ट इंडिजविरोधात आपल्या कसोटी करियरची सुरावत करू शकतो. दिलीप ट्रॉफीमध्ये सर्वात कमी वयामध्ये शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही निवड होणार असल्याचे वृत्त आहे.

शिखर धवनने आशिया चषकात पाच सामन्यात ३४२ धावा काढल्या असल्या तरी त्याच्या निवडीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. कारण कसोटी आणि वन-डे दोन्ही फॉर्मेट वेगळे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून कसोटीमध्ये निवड होईल असे नाही. इंग्लंडमध्ये शिखरने निराशजनक कामगिरी केली होती. त्यामुळे निवड समितीमध्ये शिखरची निवड करण्यावर दुमत आहे. रहाणे, पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीचे संघातील स्थान पक्के आहे. तर अश्विन आणि इंशात शर्मा यांची निवड फिटनेस टेस्टवर अवलंबून असल्याचे सुत्राने सांगितलेय. तर भुवनेश्वर आणि हार्दिकला आराम देणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा बुमराह आणि शमीवर असणार आहे.

असा असू शकतो भारतीय संघ 
पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि हनुमा विहारी

असा आहे वेस्ट इंडिजचा भारत दौरा –
कसोटी सामने –
चार ते आठ ऑक्टोबर (राजकोट )
१२ ते १६ ऑक्टोबर (हैदराबाद )

एकदिवसी सामने –
२१ ऑक्टोबर (गुवाहाटी)
२४ ऑक्टोबर (इंदौर)
२७ ऑक्टोबर (पुणे )
२९ ऑक्टोबर (मुंबई)
१ नोव्होंबर (तिरुवनंतपूरम)

टी२० सामने –
चार नोव्हेंबर (कोलकाता)
सहा नोव्हेंबर (लखनऊ)
११ नोव्हेंबर (चेन्नई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 5:41 pm

Web Title: with shikhar dhawan to be dropped prithvi shaw is set to make his test debut against west indies
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 कर्णधार म्हणून माझ्यामध्ये एमएस धोनीसारखे गुण – रोहित शर्मा
2 Asia Cup 2018 : …तर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम – रोहित शर्मा
3 हसीन जहाँपासून मला धोका, मोहम्मद शमीने केली सुरक्षारक्षकाची मागणी
Just Now!
X