ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका निश्चित करण्याच्या ध्येयाने भारतीय महिला संघ बीजिंग व तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात सहभागी होत आहे.

बीजिंग येथे बुधवारी होणाऱ्या स्पर्धेत महिला रिले संघापुढे ४३.७१ सेकंद या ऑलिम्पिक पात्रता वेळेपेक्षा कमी वेळ नोंदविण्याचे लक्ष्य असणार आहे. या स्पर्धेत त्यांना हे यश मिळाले नाही तर तैवानमध्ये १९ व २० मे रोजी तैवान ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना पुन्हा ही संधी मिळणार आहे.

भारतीय संघात द्युती चंद, श्रावणी नंदा, ज्योती मंजुनाथ, मर्लिन कुरियन जोसेफ, सिनी सहदेवन व हिमांश्री रॉय यांचा समावेश आहे. गोळाफेकीत ओमप्रकाश कऱ्हाना, अर्जुन कुमार (२०.५० मीटर पात्रता कामगिरी), लांब उडीत अंकित शर्मा (८.१५ मीटर पात्रता कामगिरी) हे खेळाडू चीन तैपेईमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत आहेत.