News Flash

Video : …आणि मैदानावरच महिला फुटबॉलपटूंमध्ये झाली तुफान हाणामारी

पंचानी दिलेला निर्णय अमान्य असल्याने दोन संघातील खेळाडू भिडल्या. यात ४ जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मैदानावरच सुरू झाला राडा

फुटबॉलच्या मैदानावर दोन खेळाडूंमध्ये राडा होणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा दोन खेळाडूंमध्ये अशा पद्धतीचे राडे किंवा धोटीमोथी हाणामारी होतच असते. पण अर्जेंटिनाच्या एका स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान महिला फुटबॉल पटूंमध्ये प्रचंड हाणामारी झाली. इतकेच नव्हे तर या हाणामारी दरम्यान चार महिला खेळाडू जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ही घटना अर्जेंटिनामध्ये घडली. तेथील युनिव्हर्सिटरीओ (Universitario) आणि लिबेर्ताद (Libertad) या दोन संघांमध्ये सामना सुरु होता. त्यावेळी पंचांनी दिलेला एक निर्णय एका संघाला पटला नाही. त्यामुळे त्या संघाच्या प्रशिक्षकाने पंचांच्या निर्णयाविरोधात मैदानात येऊन निषेध केला. मात्र त्या प्रशिक्षकाला मैदानातून बाहेर पाठवण्यात आले. त्यामुळे त्या संघाच्या खेळाडू प्रचंड संतापल्या. त्यांनतर या महिला खेळाडूंमध्ये प्रचंड हाणामारी झाली.

या हाणामारीनंतर ४ महिला खेळाडूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ज्या खेळाडूंनी या हाणामारीत सहभाग घेतला, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2018 3:45 pm

Web Title: women football teams fight over referee decisions 4 players hospitalised
टॅग : Football
Next Stories
1 Ind Vs Eng: आमची साथ सोडू नका, विराटचं भावनिक आवाहन
2 FlashBack : आज झाली होती सचिनच्या ‘या’ विक्रमाची सुरुवात…
3 Ind vs Eng : फलंदाजांच्या हाराकिरीमागचं कारण काय, रवी शास्त्रींना BCCIने विचारला जाब
Just Now!
X