27 January 2021

News Flash

महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात

कनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा तेलंगणला होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पध्रेचे यजमान महाराष्ट्राकडे सोपवण्यात आले आहे. पुरुषांच्या स्पध्रेच्या आयोजनाची जबाबदारी मात्र उत्तर प्रदेशकडे देण्यात आली आहे.

भारतीय कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक शनिवारी ऑनलाइन स्वरूपात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी महाराष्ट्राची दावेदारी सादर केली. परंतु गतवर्षी रोहा येथे पुरुषांची वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात झाली असल्याने यावेळी मात्र महिलांच्या राष्ट्रीय स्पध्रेचे यजमान देण्यात आले.

कनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा तेलंगणला होणार आहेत. वरिष्ठ गटाची फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा विदर्भात आणि कनिष्ठ गटाची आसामला होईल.

उपकनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा उत्तराखंडला होणार आहेत. याशिवाय किनारी कबड्डीचे यजमानपद आंध्र प्रदेशला आणि सर्कल कबड्डीचे पंजाबला देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 4:02 am

Web Title: women s national kabaddi championship in maharashtra zws 70
Next Stories
1 देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ
2 जैव-सुरक्षेचा सोनेरी पिंजरा!
3 भारताला मोठा झटका, रविंद्र जाडेजा चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
Just Now!
X