08 April 2020

News Flash

Womens Asia Cup T20 India vs Pakistan: पाकिस्तानला नमवत भारताची फायनलमध्ये धडक

पाकिस्तानचे ७३ धावांचे माफक आव्हान भारताने ३ विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. एकता बिष्टने तीन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Womens Asia Cup T20 India vs Pakistan: स्मृती मंधानाने (३८ धावा) कर्णधार हरमनप्रित कौरच्या (नाबाद ३४ धावा) साथीने भारताला विजयाच्या समीप नेले.

Womens Asia Cup T20 India vs Pakistan: आशिया कपमध्ये भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली. पाकिस्तानचे ७३ धावांचे माफक आव्हान भारताने ३ विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. एकता बिष्टने तीन विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

मलेशियात सुरु असलेल्या आशिया कपमध्ये शनिवारी भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या महिला गोलंदाजांनी पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. पाकिस्तानची सलामीची जोडी फक्त १ धावांवार फोडण्यात भारताला यश आले. नैन अबिदी भोपळा न फोडताच माघारी परतली. शिखा पांडेने तिची विकेट घेतली. यानंतर कोल्हापूरच्या अनुजा पाटीलने कर्णधार बिसमाह मारुफची विकेट घेत पाकला दुसरा धक्का दिला. यानंतर एकता बिष्टने अचूक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले. एकता बिष्टने ४ षटकांत १४ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. शिखा पांडे, अनुजा पाटील, पुनम यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानला २० षटकांत ७ विकेट्स गमावून फक्त ७२ धावाच करता आल्या.

पाकिस्तानचे ७३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर मिताली राज शून्यावरच बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली दिप्ती शर्मा शून्यावरच तंबूत परतली. यानंतर स्मृती मंधानाने (३८ धावा) कर्णधार हरमनप्रित कौरच्या (नाबाद ३४ धावा) साथीने भारताला विजयाच्या समीप नेले. संघाच्या ७० धावा झाल्या असताना मंधाना बाद झाली. पण तोवर भारताचा विजय निश्चित झाला होता. यानंतर कर्णधार हरमनप्रितने भारताला सहज विजय मिळवून दिला. एकता बिष्टला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे आता भारत अंतिम सामन्यात आत्मविश्वासाने उतरेल.

भारताच्या महिला संघाने सहा वेळा आशिया कपवर नाव कोरले असून याची पुनरावृत्ती करण्यात संघ यशस्वी होईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 10:34 am

Web Title: womens asia cup t20 india beat pakistan by 7 wickets to reach final ekta bisht harmanpreet kaur
Next Stories
1 विराट कोहलीने काढला दाढीचा विमा ? के एल राहुलने शेअर केला व्हिडीओ
2 अर्जून तेंडुलकरला मिळणार नाही राहुल द्रविडचं प्रशिक्षण
3 थिम प्रथमच अंतिम फेरीत
Just Now!
X