25 November 2020

News Flash

Women’s Asia Cup T20 : …तर अंतिम सामन्यात पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने

पाकिस्तानपेक्षा एक सामना कमी खेळला असल्याने बांगलादेशला मलेशियाशी होणारा सामना जिंकून थेट अंतिम फेरी गाठणे शक्य आहे.

Womens Asia Cup T20 India vs Pakistan : भारतीय महिला संघाने मलेशियात रंगलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. ७३ धावांचे माफक आव्हान भारताने केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात १६. १ षटकात पूर्ण केले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, तो निर्णय भारताच्या पारड्यात पडला. भारताने पाकिस्तानला केवळ ७३ धावांत तंबूत धाडले. कर्णधार सना मीरने सर्वाधिक २० धावा केल्या. तर एकता बिष्ट हिने सर्वाधिक ३ बळी टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार मिताली राज शून्यावर बाद झाली. पण स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी अनुक्रमे ३८ आणि ३४ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम फेरीत धडक मारली.

साखळी फेरीत भारताने ५ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ५ पैकी ३ सामने जिंकलेला पाकिस्तनाचा संघ आहे. या तक्त्यातील बांग्लादेशच्या संघाचेही ६ गुण आहेत. मात्र बांगलादेशने पाकिस्तानपेक्षा एक सामना कमी खेळला असल्याने बांगलादेशला मलेशियाशी होणारा उर्वरित सामना जिंकून थेट अंतिम फेरीत स्थान मिळणे शक्य आहे.

मलेशियाच्या संघाने बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला, तर मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातच अंतिम सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सध्या मलेशियाला चारही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे किमान शेवट गोड व्हावा, या ईर्ष्येने मलेशियाचा संघ मैदानात उतरेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे अंतिम सामन्यातील केवळ मलेशियाच्या हातात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 12:16 pm

Web Title: womens asia cup t20 india vs pakistan final
टॅग Pakistan,Sports
Next Stories
1 हरयाणा सरकारला अखेर शहाणपण; ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती
2 Womens Asia Cup T20 India vs Pakistan: पाकिस्तानला नमवत भारताची फायनलमध्ये धडक
3 विराट कोहलीने काढला दाढीचा विमा ? के एल राहुलने शेअर केला व्हिडीओ
Just Now!
X