21 September 2020

News Flash

WBBL : अबब! सर्वात जलद शतक ठोकून महिला क्रिकेटपटूने केला विक्रम

टी२० क्रिकेटच्या इतिहासात कोरले आपले नाव

ग्रेस हॅरीस

Womens Big Bash League स्पर्धेत ग्रेस हॅरीसने बुधवारी विक्रमी खेळी केली. हॅरीसने ४२ चेंडूत शतक ठोकून या स्पर्धेतील सर्वात जलद शतक करण्याचा केला. ब्रिस्बेन हिट या संघाकडून खेळताना तिने महिला टी२० क्रिकेटच्या इतिहासातही आपले नाव कोरले. महिला टी२० मधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले. याआधी वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन हिने २०१० साली झालेलय टी२० विश्वचषक स्पर्धेत ३८ चेंडूमध्ये शतक झळकावले होते.

 

हॅरीसने या खेळीत १३ चौकार आणि ६ षटकार लगावले. अर्धशतक ठोकण्यासाठी तिने २३ चेंडू खेळले पण त्यानंतर पुढील ५१ धावा ठोकण्यासाठी तिने केवळ १९ चेंडू घेतले. या डावात तिला नशिबाची साथ लाभली. ९२ धावांवर खेळत असताना तिला जीवदान मिळाले होते. हे तिचे स्पर्धेतील दुसरे शतक ठरले.

 

तिने मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध खेळताना नाबाद १०१ धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला दहा गडी राखून विजय मिळवून दिला. तिच्या खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन हिट संघाने १३३ धावांचे लक्ष्य ११ व्या षटकांत पूर्ण केले. हॅरीस ९५ धावांवर खेळत असताना संघाला विजयासाठी एकच धाव हवी होती. त्यावेळी हॅरिसने षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला आणि विक्रमी शतक झळकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 5:59 pm

Web Title: womens big bash league grace harris hits fastest century in wbbl history 2nd fastest in women t20 history
Next Stories
1 IPL Auction 2019 – जाणून घ्या कोणी विकत घेतले कोणते खेळाडू?
2 भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवारच?
3 IPL 2019 : टीम इंडियासाठी शतक, सामनावीर .. तरीही UNSOLD का? – मनोज तिवारी
Just Now!
X