06 August 2020

News Flash

महिला क्रिकेट संघ दडपण हाताळण्यात अपयशी – हेमलता

हरमनप्रीत कौर ही सध्याच्या घडीची भारताची सर्वोत्तम कर्णधार

संग्रहित छायाचित्र

 

भारताचा महिला क्रिकेट संघ मोठय़ा स्पर्धामध्ये बाद फेरीतील महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये दडपण हाताळण्यात अपयशी ठरतो, याकडे निवड समिती प्रमुख हेमलता काला यांनी लक्ष वेधले आहे. मात्र त्याच वेळेला हरमनप्रीत कौर ही सध्याच्या घडीची भारताची सर्वोत्तम कर्णधार आहे, असेही लवकरच निवड समिती प्रमुख पदावरून दूर होणाऱ्या हेमलता यांनी म्हटले.

‘‘भारताच्या संघात युवा आणि अनुभवी या प्रकारच्या खेळाडूंचा योग्य भरणा आहे. मात्र तरीदेखील महत्त्वपूर्ण लढती खेळण्यासाठी अजून खेळाडू पूर्णपणे सज्ज नाहीत. महत्त्वपूर्ण लढतीत फलंदाजीतील अपयश नुकसानीचे ठरते. दडपण हाताळण्यात खेळाडूंना अपयश येत आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या अव्वल संघांना विविध स्पर्धात पराभूत करत आहे. मात्र मोठय़ा स्पर्धामध्ये अंतिम लढतींसारख्या मोक्याच्या वेळेस अपयशी ठरत आहे,’’ असे हेमलता यांनी सांगितले.

भारताचा महिला क्रिकेट संघ गेल्या काही वर्षांत विश्वचषकामध्ये अंतिम फेरीत पराभूत झाला आहे. २०१७ मधील एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम लढत आणि यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताचा पराभव झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:09 am

Web Title: womens cricket team fails to handle oppression hemalatha abn 97
Next Stories
1 खेळाडूंसाठी लॉकडाउन म्हणजे दुधारी तलवार – मोहम्मद शमी
2 चॅपल एकटे दोषी नाहीत, मला कर्णधार पदावरुन हटवण्यात सर्वांचा सहभाग – सौरव गांगुली
3 आम्ही प्रयत्न केला पण…२०१९ विश्वचषकातील ‘त्या’ पराभवावर व्यक्त झाला रविंद्र जाडेजा
Just Now!
X