२०२२ साली बर्मिंगहम येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ICC आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन यांनी गुरुवारी याबद्दल अधिकृत घोषणा केली. महिला क्रिकेटला राष्ट्रकुल खेळांमध्ये संधी मिळण्याची ही पहिली वेळ मानली जात आहे. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान बर्मिंगहम येथे राष्ट्रकुल खेळांचं आयोजन केलं जाणार आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेट खेळवण्याची ही पहिलीच वेळ असली तरीही १९९८ साली क्वालालांपूर राष्ट्रकुल खेळांमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा सहभाग करण्यात आला होता.
८ संघांना या स्पर्धेत सहभाग मिळणार आहे. यजमान देश म्हणून इंग्लंडच्या महिलांना यात थेट संधी मिळणार असून १ एप्रिल २०२१ पर्यंत टी-२० क्रमवारीत पहिल्या ६ क्रमांकावर असणारे महिला संघही या स्पर्धेसाठी थेट पात्र होतील. उर्वरित दोन संघांना क्वालिफायर सामन्यांतून आपलं स्थान कमवावं लागणार आहे.
Women's cricket will be a part of the Commonwealth Games for the first time in the Birmingham 2022 edition
The ICC has announced a qualification process for the eight-team tournament
Details
— ICC (@ICC) November 18, 2020
राष्ट्रकुल खेळांच्या माध्यमातून सर्व महिला संघांना आपलं कौशल्य जगासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे अशी भावना कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 8:55 pm