भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा फलंदाजीत हाराकिरी केल्यामुळे त्यांना तिरंगी महिला ट्वेन्टी-२० मालिकेत इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने भारतावर चार गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतरही डाव कोलमडल्यामुळे भारताला २० षटकांत ६ बाद १२३ धावाच करता आल्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. हे आव्हान पार करताना नताली शिव्हरने आक्रमक अर्धशतक साकारले. त्यामुळे इंग्लंडने सात चेंडू राखून विजय मिळवला. शिव्हरने ३८ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला : २० षटकांत ६ बाद १२३ (स्मृती मानधना ४५; अ‍ॅन्या श्रबसोल ३/३१) पराभूत वि. इंग्लंड महिला : १८.५ षटकांत ६ बाद १२४ (नताली शिव्हर ५०; राजेश्वरी गायकवाड ३/२३). ’ सामनावीर : अ‍ॅन्या श्रबसोल.