Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Ban : टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाने बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. शफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करणे बांगलादेशी फलंदाजांना शक्य झाले नाही. पूनम यादवचे ३ बळी आणि तिला शिखा पांडे, अरूंधती रेड्डी यांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताने बांगलादेशला ८ बाद १२४ धावांवरच रोखले आणि स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.

अजब-गजब रनआऊट! VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सामन्यात बांगलादेशची कर्णधार सलमा खातून हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इन-फॉर्म सलामीवीर स्मृती मानधना हिच्या अनुपस्थितीत रिचा घोषला संघात स्थान मिळाले. स्मृती मानधना संघात नसल्याने यष्टीरक्षक तानिया भाटीया हिला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली, पण ती केवळ २ धावा करून माघारी परतली. धडाकेबाज फटकेबाजी करणारी शफाली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरली. १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार खेचत तिने ३९ धावा केल्या आणि ती बाद झाली.

ट्रम्प यांनी केलं सचिन, विराटचं तोंडभरून कौतुक

भारत चांगली भागीदारी करताना दिसत असतानाच वाईडचा चेंडू मारताना कर्णधार हरमनप्रीत बाद झाली. तिने ११ चेंडूत ८ धावा केल्या. संयमी खेळी करणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज चोरटी धाव घेताना धावबाद झाली. ती ३७ चेंडूत ३४ धावा करून माघारी परतली आणि भारताला चौथा धक्का बसला. स्मृती मानधना हिच्या जागी संघात स्थान मिळालेली रिचा घोष मोठा फटका खेळताना झेलबाद झाली आणि भारताचा निम्मा संघ माघारी परतला. तिने १४ चेंडूत १४ धावा केल्या. त्यानंतर दिप्तीदेखील ११ धावा काढून धावबाद झाली. शेवटच्या टप्प्यात वेदा कृष्णमूर्ती हिने ४ चौकारांसह ११ चेंडूत २० धावा केल्या आणि भारताला १४२ धावांचा टप्पा गाठून दिला. १७ चेंडूत ३९ धावा करणारी शफाली सामनावीर ठरली.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच पहिलं यश मिळाला. सलामीवीर शमिमा सुलताना मोठा फटका खेळताना बाद झाली. तिने केवळ ३ धावा केल्या. संयमी खेळ करत भागीदारी रचताना बांगलादेशला दुसरा धक्का बसला. मुर्शिदा खातून २६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतली. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे बांगलादेशचे पुढचे दोन गडी झटपट तंबूत परतले. आधी संजीदा इस्लाम १० धावांवर बाद झाली, तर पाठोपाठ फरगाना हक शून्यावर तंबूत गेली.

मॅच फिक्सिंग : ICC कडून क्रिकेटपटूवर ७ वर्षांची बंदी

विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी फटकेबाजी करताना फाहीमा खातून बाद झाली आणि बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला. एक बाजू लावून धरत २६ चेंडूत ३५ धावांची धडाकेबाज खेळी करणारी निगर सुलताना झेलबाद झाली. तिला राजेश्वरी गायकवाडने बाद केले. त्यानंतर मात्र बांगलादेशला डोकं वर काढता आलं नाही. पूनम यादवने ३; शिखा पांडे, अरूंधती रेड्डीने २-२ बळी आणि गायकवाडने १ बळी टिपत बांगलादेशला २० षटकात ८ बाद १२४ धावांवरच रोखले.

Video : स्मिथची ‘हवाई फिल्डिंग’! सीमारेषेवर षटकार जात असताना काय केलं पाहा…

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सामन्यात भारताची अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना खेळू शकली नाही. तिच्या जागी संघात रिचा घोष हिला संधी देण्यात आली होती.

Live Blog

20:06 (IST)24 Feb 2020
भारताकडून बांगलादेशचा धुव्वा; मिळवला सलग दुसरा विजय

भारतीय महिला संघाने बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघाने बांगलादेशला दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे बांगलादेशी फलंदाजांना शक्य झाले नाही. भारताने बांगलादेशला ८ बाद १२४ धावांवरच रोखले आणि स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला.

19:34 (IST)24 Feb 2020
पूनम यादवचा तिसरा बळी

पूनम यादवने तिसरा बळी घेत बांगलादेशला सातवा धक्का दिला. जाहाराना आलम १० धावा करून माघारी परतली.

19:31 (IST)24 Feb 2020
धडाकेबाज निगर सुलताना झेलबाद

एक बाजू लावून धरत २६ चेंडूत ३५ धावांची धडाकेबाज खेळी करणारी निगर सुलताना झेलबाद झाली. तिला राजेश्वरी गायकवाडने बाद केले.

19:23 (IST)24 Feb 2020
बांगलादेशचा निम्मा संघ बाद

विजयासाठी आवश्यक असलेली धावगती गाठण्यासाठी फटकेबाजी करताना फाहीमा खातून बाद झाली आणि बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला.

19:08 (IST)24 Feb 2020
भारताची दमदार गोलंदाजी; बांगलादेशचे चार गडी तंबूत

भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे बांगलादेशचे दोन गडी झटपट तंबूत परतले. आधी संजीदा इस्लाम १० धावांवर बाद झाली, तर पाठोपाठ फरगाना हक शून्यावर तंबूत गेली.

18:54 (IST)24 Feb 2020
बांगलादेशला दुसरा धक्का, मुर्शिदा खातून माघारी

संयमी खेळ करत भागीदारी रचताना बांगलादेशला दुसरा धक्का बसला. मुर्शिदा खातून २६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतली.

18:30 (IST)24 Feb 2020
भारताला पहिलं यश, शमिमा सुलताना बाद

१४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच पहिलं यश मिळाला. सलामीवीर शमिमा सुलताना मोठा फटका खेळताना बाद झाली. तिने केवळ ३ धावा केल्या.

18:11 (IST)24 Feb 2020
बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान

टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा बांगलादेशशी सामना सुरू आहे. शफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकात ६ बाद १४२ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १४३ धावांचे आव्हान ठेवले.

17:52 (IST)24 Feb 2020
भारताला सहावा धक्का

सामन्यात एक अत्यंत अजब-गजब असा रनआऊट पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज एकाच बाजूच्या क्रीजमध्ये धावल्या, त्यावेळी दुसऱ्या दिशेला खेळाडूने स्टंप उडवत एका फलंदाजाला बाद केले. या प्रकरणी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली आणि बराच काळ व्हिडीओ पाहून अखेर दिप्तीला धावबाद ठरवण्यात आले.

17:45 (IST)24 Feb 2020
मोठा फटका खेळताना रिचा झेलबाद

स्मृती मानधना हिच्या जागी संघात स्थान मिळालेली रिचा घोष मोठा फटका खेळताना झेलबाद झाली आणि भारताचा निम्मा संघ माघारी परतला. तिने १४ चेंडूत १४ धावा केल्या.

17:31 (IST)24 Feb 2020
मुंबईकर रॉड्रीग्ज धावबाद, भारताला चौथा धक्का

संयमी खेळी करणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज चोरटी धाव घेताना धावबाद झाली. ती ३७ चेंडूत ३४ धावा करून माघारी परतली आणि भारताला चौथा धक्का बसला.

17:16 (IST)24 Feb 2020
व्हाईडचा चेंडू मारताना कर्णधार हरमनप्रीत बाद

भारत चांगली भागीदारी करताना दिसत असतानाच व्हाईडचा चेंडू मारताना कर्णधार हरमनप्रीत बाद झाली. तिने ११ चेंडूत ८ धावा केल्या.

16:59 (IST)24 Feb 2020
धडाकेबाज शफाली बाद, भारताला दुसरा धक्का

धडाकेबाज फटकेबाजी करणारी शफाली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरली. १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार खेचत तिने ३९ धावा केल्या आणि ती बाद झाली.

16:53 (IST)24 Feb 2020
मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर

इन-फॉर्म सलामीवीर स्मृती मानधना हिला ताप आल्याने तिला या सामन्याला मुकावे लागले आहे. तिच्या अनुपस्थितीत रिचा घोषला संघात स्थान मिळाले आहे.

16:45 (IST)24 Feb 2020
भारताला पहिला धक्का

स्मृती मानधना दुखापतग्रस्त झाल्याने यष्टीरक्षक तानिया भाटीया हिला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली, पण ती केवळ २ धावा करून माघारी परतली.

16:40 (IST)24 Feb 2020
बांगलादेशची प्रथम गोलंदाजी

बांगलादेशची कर्णधार सलमा खातून हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.