आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याचा काळ हा गोलंदाजांपेक्षा फलंदाजांसाठी अधिक महत्वाचा आणि सुपीक दिसून येत आहे. नुकतेच इंग्लंडच्या जून २०१८मध्ये तब्बल ४८१ धावा ठोकून एकदिवसीय क्रिकेटमधील उच्चांकी धावसंख्या नोंदवली. पण अॅडिलेडमधील एका स्थानिक क्रिकेट संघाने यापुढे जाऊन एक भला मोठा पराक्रम केला आहे. नॉर्थन डिस्ट्रीकट्स या अॅडिलेडमधील एका संघाने तब्बल ५७१ धावांनी हा सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाच्या जिल्हास्तरीय महिला स्पर्धेमध्ये नॉर्थन डिस्ट्रीकट्स आणि पोर्ट अॅडिलेड या दोन संघामध्ये सामना सुरु होता. यावेळी नॉर्थन डिस्ट्रीकट्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकात तब्बल ५९६ धावा ठोकल्या. महत्वाचे म्हणजे या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पोर्ट अॅडिलेड संघाचा नॉर्थन डिस्ट्रीकट्सने केवळ २५ धावांत धुव्वा उडवला. त्यामुळे नॉर्थन डिस्ट्रीकट्स संघाने हा सामना ५७१ धावांनी जिंकून नवा इतिहास रचला.

या सामन्यात नॉर्थन डिस्ट्रीकट्सकडून केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या उभारण्यात आली. नॉर्थन डिस्ट्रीकट्सच्या चारही खेळाडूंनी शतक झळकावले. टेगॅन मॅकफर्लीन, सॅम बेट्स, तभीता सॅव्हील आणि डार्सी ब्राऊन या खेळाडूंनी मिळून ही डोंगराएवढी धावसंख्या उभारली. यात टेगॅन मॅकफर्लीनने सर्वाधिक १३६ धावा (८० चेंडू) केल्या. बेट्सने ७१ चेंडूत १२४, ब्राऊनने ८४ चेंडूत ११७ धावा तडकावल्या. तर सॅव्हीलने ५६ चेंडूत १२० धावा ठोकल्या.

धावफलक

या सामन्यात नॉर्थन डिस्ट्रीकट्सच्या गोलंदाजांनीही आपली कमाल दाखवली. पोर्ट अडिलेड संघाचे केवळ १० खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर होते. त्यापैकी आठच खेळाडूंनी फलंदाजी केली. पण त्यांना एकूण केवळ ११ षटके मैदानावर तिला ठोकत आला.