01 October 2020

News Flash

World Badminton Championships 2018 : श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018 : दोनही सामन्यात 'कमबॅक'ची कमाल

राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेकीत एच. एस. प्रणॉयची श्रीकांतवर मात

World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चाहत्यांना मिश्र भावनांना सामोरे जावे लागले. एकीकडे किदम्बी श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक दिली. तर दुसरीकडे प्रणॉयला ब्राझीलच्या बॅडमिंटनपटूकडून पराभूत व्हावे लागले.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने स्पेनच्या पाब्लो एबियन याचा पराभव केला. त्याने पाब्लोला २१-१५, १२-२१, २१-१४ असे पराभूत केले. पहिला गेम पाब्लोने २१-१५ असा जिंकला. पण पुढील गेममध्ये श्रीकांतने जोरदार ‘कमबॅक’ केला आणि २१-१२ असा गेम जिंकला. सामन्याचा तिसरा गेम निर्णायक होता. हा सामना चांगलाच रंगला पण अखेर श्रीकांतने २१-१४ असा हा गेम जिंकला आणि सामना आपल्या नावे केला.

दुसरीकडे भारताच्या एच एस प्रणॉयला पराभवाला सामोरे जावे लागले. ब्राझीलच्या यगॉर कोएल्हो याने प्रणॉयला ८-२१, २१-१६, २१-१५ असे पराभूत केले. पहिला गेम प्रणॉयने २१-८ असा सहज जिंकला. त्यावेळी पुढील दोन गेम कोएल्होच्या पारड्यात पडतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण कोएल्होने अप्रतिम पुनरागमन केले आणि पुढील दोन्ही गेम २१-१६, २१-१५ असे जिंकले. या विजयामुळे कोएल्हो पुढील फेरीत गेला तर प्रणॉयला घरचे तिकीट काढावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2018 6:39 pm

Web Title: world badminton championships 2018 k shrikant advances to next level hs prannoy out of tournament
टॅग Badminton
Next Stories
1 World Badminton Championships 2018 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक
2 England vs India 1st Test – Live : अश्विनच्या फिरकीची जादू कायम; दिवसअखेर इंग्लंड ९ बाद २८५
3 अपनी जीत हो, उनकी हार हाँ..
Just Now!
X