News Flash

World Badminton Championships 2018 : सायनापाठोपाठ सिंधूही उपांत्यपूर्व फेरीत

World Badminton Championships 2018 : जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या संग जी ह्युंगचा केला २१-१०, २१-१८ असा केला पराभव

पी. व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू पी व्ही सिंधू हिने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज या सामन्याआधी भारताची फुलराणी सायना नेहवाल हिनेही विजयी घोडदौड सुरु ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांना दुहेरी आनंद मिळाला आहे.

आज झालेल्या सामन्यात सिंधूने अत्यंत सुंदर खेळ केला. पहिला गेम सिंधूने अतिशय सहज जिंकला. या गेममध्ये तिने २१-१० असा तब्बल ११ गुणांचा फरक राखला. पण दुसरा गेम मात्र थोडा संघर्षपूर्ण झाला. या गेममध्ये संग जी ह्युंग हिने आपल्या क्रमवारीतील स्थानाला साजेसा खेळ करत झुंज दिली. पण अखेर उत्तम लयीत असलेल्या सिंधूने २१-१८ अशा फरकाने तिला पराभूत केले आणि सामना जिंकला.

पुढील फेरीत तिचा सामना जपानच्या नोझुमी ओकुहरा हिच्याशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 6:54 pm

Web Title: world badminton championships 2018 pv sindhu quarter finals tournament
टॅग : Pv Sindhu
Next Stories
1 World Badminton Championships 2018 : सायनाची विजयी घोडदौड सुरूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक
2 India vs England : बार-बार लगातार…. अश्विनच्या जाळ्यात आठव्यांदा अडकला ‘हा’ दिग्गज
3 World Badminton Championships 2018 : उप-उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X