19 February 2019

News Flash

World Badminton Championships 2018 : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

World Badminton Championships 2018 : इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा २१-१४, २१-९ असा पराभव

World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बँडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने आज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने इंडोनेशियाच्या फित्रीयानी हीचा उपउपांत्यपूर्व फेरीत २१-१४, २१-९ असा पराभव केला.

एका मोठ्या विश्रांतीनंतर कोर्टवर उतरलेल्या सिंधूने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरु आहे. आज तिची गाठ इंडोनेशियाच्या फित्रीयानी हिच्याशी पडली. या सामन्यातील पहिल्या गेममध्ये सिंधूला विजयासाठी काही काळ झुंजावे लागले. अखेर २१-१४ अशा फरकाने सिंधूने तो गेम आपलूया खिशात घातला. त्यानंतर दुसरा गेमही संघर्षपूर्ण होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने पूर्ण वर्चस्व राखले आणि दुसरा गेम २१-९ असा अगदी सहज जिंकला.

या विजयामुळे सिंधूने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. या फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या संग जी ह्युंग हिच्याशी होणार आहे.

First Published on August 1, 2018 5:16 pm

Web Title: world badminton championships 2018 pv sindhu reach quarter finals
टॅग Badminton,Pv Sindhu