News Flash

World Badminton Championships 2018 : उप-उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

World Badminton Championships 2018 : दोन सरळ गेममध्ये पराभव

किदम्बी श्रीकांत (संग्रहित)

World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मलेशियाच्या डॅरेन लुई याने श्रीकांतला २१-१८, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिला गेम अतिशय अटीतटीचा झाला. यात ३ गुणांच्या फरकाने श्रीकांत कमी पडला. दुसऱ्या गेममध्ये पुन्हा श्रीकांतकडून निकराची झुंज पाहायला मिळाली. पण अखेर पहिल्याच गेमची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.

काल झालेल्या सामन्यात श्रीकांतने स्पेनच्या पाब्लो एबियन याचा पराभव केला होता. त्याने पाब्लोला २१-१५, १२-२१, २१-१४ असे पराभूत केले होते. काल पहिला गेम पाब्लोने २१-१५ असा जिंकला होता, पण पुढील गेममध्ये श्रीकांतने जोरदार ‘कमबॅक’ केला आणि दोंन्ही गेम २१-१२, २१-१४ असे जिंकले. असाच कमबॅक आजही श्रीकांत करेल, अशी साऱ्यांना अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली आणि त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 4:45 pm

Web Title: world badminton championships 2018 quarter final k shrikanth lose
Next Stories
1 England vs India 1st Test Day 2 : विराटने वसूल केला ‘लगान’; दिवसअखेर इंग्लंड १ बाद ९
2 BLOG : England vs India 1st Test इंग्लंडची धावसंख्या बेताची पण आव्हानात्मक
3 भारतीय खेळाडूंना इंजेक्शन्स नेण्यास ‘आयओए’चा विरोध
Just Now!
X