World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील भारताच्या साई प्रणितचे आव्हान आज संपुष्टात आले. जपानच्या केंटो मोमोटा याने प्रणितला २१-१२, २१-१२ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये जो खेळ झाला. त्याचीच पुनरावृत्ती दुसऱ्या गेममध्येही पाहायला मिळालेली. सुरुवातीला साई प्रणीतचा खेळ धारदार होता. मात्र नंतर जपानच्या मोमोटाने चपळ खेळ करत प्रणीतला मागे टाकले. पहिला डाव त्याने २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये प्रणित कमबॅक करेल, अशी अपेक्षा होती. पण हा गेमदेखील समान फरकाने जिंकत मोमोटाने सामन्यात विजय मिळवला आणि साई प्रणीतला स्पर्धेबाहेर जावे लागले.

त्याआधी सायना नेहवालचे आव्हन संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत सामन्यात कॅरोलिना मरिनने तिचा ६-२१, ११-२१ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायना आणि साई प्रणित पराभूत झाल्याने आता भारतीय बॅटमिंटन चाहत्यांच्या नजरा पी व्ही सिंधू हिच्यावर असतील.