World Badminton Championships 2018 : चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने हीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला. या विजयाबरोबरच सिंधूने ओकुहाराने मागील स्पर्धेत तिला केलेल्या पराभवाचा वचपा काढला. तिचा पुढील फेरीतील सामना अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे.

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला.