News Flash

अमित पांघलवर भारताच्या जागतिक पदकाच्या आशा

भारताच्या आव्हानाची प्रमुख धुरा ही अमित पांघलवर असणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

आतापर्यंतच्या २० जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धामध्ये भारताने फक्त चार पदके मिळवली आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान निश्चित करण्याचे दडपण नसले तरी अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक आहेत. भारताच्या आव्हानाची प्रमुख धुरा ही अमित पांघलवर असणार आहे.

विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) व गौरव बिधुरी (२०१७) यांनी जागतिक पदके जिंकली आहेत. या चौघांनाही कांस्यपदके जिंकता आली आहेत. त्यामुळे कामगिरी उंचावण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे. परंतु यंदा आशियाई सुवर्णपदक विजेता अमित कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघ

अमित पांघल (५२ किलो), कविंदर बिश्त (५७ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), दुर्योधन सिंग नेगी (६९ किलो), आशीष कुमार (७५ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो), संजीत (९१ किलो), सतीश कुमार (+९१ किलो)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 1:53 am

Web Title: world boxing competition amit panghal abn 97
Next Stories
1 भारताकडेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडवण्याची क्षमता!
2 ‘अ‍ॅशेस’ ऑस्ट्रेलियाकडेच! इंग्लंडचा १८५ धावांनी धुव्वा
3 अफगाणिस्तान पहिल्या कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर
Just Now!
X