News Flash

पीव्ही सिंधूला राग अनावर; म्हणाली, “जर हे थांबलं नाही, तर…”

कौटुंबिक वादामुळे भारत सोडून लंडन गाठलं? सिंधूने स्वत:च दिलं उत्तर

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने ऑलिम्पिक तयारीसाठी सुरु असलेलं राष्ट्रीय शिबीर अर्ध्यावर सोडलं आणि ती थेट लंडनमध्ये दाखल झाली. शिबीर अर्ध्यावर सोडण्याच्या तिच्या निर्णयावर भारतीय बॅडमिंटन जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. तंदुरूस्ती आणि न्यूट्रीशनसाठी लंडनमध्ये दाखल झाल्याचं तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. पण या दरम्यान, सिंधू कौटुंबिक वादाला कंटाळून भारत सोडून लंडनला गेल्याची चर्चा रंगली. यावर आता थेट सिंधूनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

गेले काही दिवस सिंधू UKमध्ये आहे. सिंधूने सोमवारी तेथील एक फोटोदेखील पोस्ट केला. त्या फोटोसोबत तिने लिहिले की ती तंदुरूस्ती आणि न्यूट्रीशनच्या कारणास्तव लंडनला रवाना झाली आहे. पण सिंधू कौटुंबिक वादामुळे भारत सोडून लंडनला गेली असा दावा टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने केला. या वृत्तावर सिंधूने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

“मी काही दिवसांपूर्वी न्यूट्रीशन आणि इतर फिटनेस संदर्भातील गोष्टींकडे लक्ष पुरवण्याच्या उद्देशाने लंडनमध्ये दाखल झाले आहे. मी माझ्या पालकांच्या परवानगीनेच येथे आले आहे. माझ्या घरात कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक वाद नाहीत. माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं, अशा पालकांबद्दल मला तक्रारी का असतील? तसेच माझा गोपीचंद सर किंवा त्यांच्या अकादमीतील प्रशिक्षकांचीही कोणता वाद किंवा मतभेद नाही. त्यामुळे जे लोकं खोट्या बातम्या देत आहेत, त्यांनी बातम्या देण्याआधी त्याची सत्यता तपासून पाहावी. माझ्या स्पष्टीकरणानंतरही जर हे थांबलं नाही, तर मला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल”, असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

I came to London a few days back to work on my nutrtion and recovery needs with GSSI.Infact I have come here with the consent of my parents and absolutely they were no family rifts in this regard. Why will I have problems/issues with my parents who have sacrificed their lives for my sake. Mine is a very close knitted family and they will always support me. I am in touch with my family members everyday. Also I do not have any issues with my coach Mr Gopichand or the training facilities at the academy. Mr M. Ratnakar the sports reporter of TOI who is spreading false news should know the facts first before writing them. If he doesn’t stop, I may have to resort to legal proceedings against him. @toi_sports @gopichandpullela

A post shared by sindhu pv (@pvsindhu1) on

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधू जेव्हा लंडनला गेली, तेव्हा ती रागात असल्याचे दिसले. कौटुंबिक तणाव हे त्या संतापामागचे कारण असल्याचे बोलले जात होते. तसेच हैदराबाद सोडण्यापूर्वी सिंधूने गोपीचंद अ‍ॅकेडमीतील प्रशिक्षकांना पुढचे आठ ते दहा आठवडे ती भारतात परतणार नसल्याचे सांगितले, असेही वृत्तात नमूद करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 8:14 pm

Web Title: world champion pv sindhu angry trashes reports of rift with family coach pullela gopichand clarification instagram slams false reports gives warning vjb 91
Next Stories
1 एक रोमँटिक संध्याकाळ… धनश्री अन् चहलचा ‘हा’ फोटो पाहिलात का?
2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाचव्या स्थानासाठी शार्दुल ठाकूर-मोहम्मद सिराजमध्ये शर्यत
3 धोनीच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला माजी कर्णधार
Just Now!
X