News Flash

बरोबरीची कोंडी सुटेना..

विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

| November 19, 2016 02:23 am

विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

आव्हानवीर सर्जी कर्जाकिन हा अभेद्य बचाव करण्याबाबत ख्यातनाम आहे. त्याचा पोलादी बचाव छेदण्यात विद्यमान विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला पाचव्या डाव्यातही यश मिळाले नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीमधील पाचवा डावही बरोबरीत राहिला. १२ डावांच्या या लढतीत दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी अडीच गुण झाले आहेत.

कार्लसन हा जागतिक दर्जाच्या स्पर्धेत नेहमीच विविधता आणण्याचा प्रयत्न करीत असतो. या लढतीतही त्याने तीन वेगवेगळ्या प्रारंभ तंत्रांचा उपयोग करीत कर्जाकिनला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने चौथ्या चालीला कॅसलिंग करीत राजाला संरक्षण दिले. पाठोपाठ कर्जाकिननेही त्याचाच कित्ता गिरवला. कार्लसनचा वजिराच्या बाजूने आक्रमण करण्याचा इरादा होता. त्या दृष्टीने त्याने चालीही केल्या. परंतु कर्जाकिनने आपले दोन्ही घोडे राजाच्या बाजूने दामटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या चालीमुळे कार्लसनला थोडेसे आश्चर्यचकित केले. साहजिकच त्यालाही राजाच्या बाजूने प्रत्युत्तर देण्याखेरीज पर्याय नव्हता. डावाच्या मध्यास दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे छोटे मोहरे घेण्यावर भर दिला. कार्लसनने प्रामुख्याने वजीर व हत्तीच्या साहाय्याने आक्रमण करण्यावर जोर दिला होता. कर्जाकिननेही हत्ती व वजिराचाच उपयोग केला. कार्लसनने एकदा वजिरावजिरीसाठी प्रयत्न केला, मात्र कर्जाकिनने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. पण ५०व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे वजीर घेतले. त्यानंतर कर्जाकिनने आपला हत्ती कार्लसनच्या हत्तीच्या रांगेत नेला.

एकमेकांचे हत्ती मिळवल्यानंतर आक्रमणासाठी फारशी संधी नाही, हे ओळखून ५१व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. त्या वेळी दोन्ही खेळाडूंकडे एक हत्ती, एक उंट व तीन प्यादी अशी स्थिती होती. कर्जाकिनच्या तुलनेत कार्लसनचे तिसरे प्यादे अन्य दोन प्याद्यांपेक्षा दूर होते. पण हे प्यादे शेवटच्या घरात नेणे कठीण होते. त्यामुळे त्याने विजय मिळवण्याचा विचार सोडून दिला.

untitled-15

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:23 am

Web Title: world chess championship tournament 2016
Next Stories
1 कॉलिनचा पदार्पणातच बळींचा षटकार
2 ‘तिरक्या’ चालींमुळे खेळाडूंचे नुकसान
3 पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यफेरीत
Just Now!
X