01 March 2021

News Flash

World Cup 2019 : स्पर्धेआधीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का

स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीचा आलेख आधीच ढासळलेला आहे

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेआधी गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीचा आलेख आधीच ढासळलेला होता. त्यात सेकर यांचा पदाचा राजीनामा ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठा झटका मानला जात आहे.

डेव्हिड सेकर यांनी संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ त्यांचा आभारी आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांची नवी फळी उभारण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यासारख्या गोलंदाजांची कामगिरी सुधारण्यात सेकर यांचा मोलाचा वाटा होता, असे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सेकर यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना म्हटले.

पुरुष संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी असताना मी माझे काम आनंदाने केले. मला ही संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. ही संधी दिल्याबाबत मी ऑस्ट्रेलियाचा आभारी आहे, असे राजीनामा दिल्यानंतर साकेर म्हणाले.

दरम्यान, भारत दौऱ्यासाठी ट्रॉय कूले हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 6:03 pm

Web Title: world cup 2019 australia assistant bowling coach david saker resigned
Next Stories
1 सुवर्णपदक विजेता तिरंदाज जसपाल सिंग याचा अपघाती मृत्यू
2 धोनीच्या टीकाकारांना शास्त्री गुरुजींनी झापले, म्हणाले…
3 मुंबईकर पृथ्वी शॉची मास्टर ब्लास्टरकडून स्तुती
Just Now!
X