21 October 2020

News Flash

World Cup 2019 : इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया नवीन रुपात, भगव्या जर्सीमध्ये मैदानात येणार

३० जूनरोजी भारताची इंग्लंडविरुद्ध लढत

२०१९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध सामन्यात एका नवीन रुपामध्ये मैदानात उतरणार आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी आयसीसीने फुटबॉल स्पर्धांमध्ये होम आणि अवे जर्सी अशा संकल्पना राबवली होती. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारत भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : वरुणराजाची कृपा, भारत-अफगाणिस्तान सामना होणारच !

मात्र ही भगव्या रंगाची जर्सी नेमकी कशी असणार आहे, याबाबत अद्याप साशंकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या कॉलरची पट्टी ही भगव्या रंगाची असणार आहे. थोड्याच दिवसात भारतीय संघ व्यवस्थापन आपली भगव्या रंगाची जर्सी अधिकृतरित्या समोर आणणार आहे.

साऊदम्पटनच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने भगव्या रंगाची जर्सी घालणं अपेक्षित होतं. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने आपण इंग्लंडविरुद्ध सामन्यात नवीन जर्सी घालणार असल्याचं कळवलं. त्यामुळे भारतीय संघाची ही नवीन जर्सी नेमकी कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 3:18 pm

Web Title: world cup 2019 india to sport orange away jersey against england psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : टीम इंडियाला आणखी एक धक्का; विजय शंकरला दुखापत
2 World Cup 2019 : सेहवागची भारताच्या प्रतिस्पर्ध्यांना ‘वॉर्निंग’
3 World Cup 2019 : धोनी, पांड्या, कोहली.. तुम्हीच सांगा कोणाची हेअरस्टाईल सर्वात भारी
Just Now!
X