19 January 2021

News Flash

World Cup 2019: जखमी अवस्थेतही धोनी मैदानात लढत होता, रक्त थुंकतानाचा फोटो व्हायरल

संथ खेळीमुळे टीका होत असताना धोनीचा हा फोटो व्हायरल झाला आहे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सध्या टीकेची झोड उठली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला असला तरी, संथ खेळीमुळे धोनीवर मात्र सतत टीका होत आहे. धोनी नेहमीप्रमाणे स्फोटक खेळी करण्यात अपयशी ठरत असल्याने त्याचे चाहतेही नाराज आहेत. अनेकांनी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवृत्ती घे असा सल्ला दिला आहे.

इंग्लंडविरोधातील सामन्यातही महेंद्रसिग धोनीवर प्रचंड टीका झाली होती. भारताचा या सामन्यात ३१ धावांनी पराभव झाल्या कारणाने पुन्हा एकदा धोनीला टीकाकारांनी टार्गेट केलं होतं. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर भारतीय संघाला पाच षटकांमध्ये ५० धावांची गरज होती. मात्र धोनी फलंदाजी करताना धावांसाठी झगडत असल्याचं दिसत होतं. केदार जाधवसोबत धोनीने ३१ चेंडूत फक्त ३९ धावा केल्या. धोनीने केदार जाधवसोबत केलेल्या धीम्या फलंदाजीमुळेच भारताचा पराभव झाल्याची टीका यानंतर करण्यात आली.

World Cup 2019: संथ खेळीवरुन टीका करणाऱ्यांना धोनीचं उत्तर
WC 2019: महेंद्रसिंग धोनीच्या संथ फलंदाजीवर सचिन तेंडुलकर म्हणतो…
उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान? जाणून घ्या शक्यता…

सामना संपला तेव्हा धोनीने ३२ चेंडूत ४१ धावा केलेल्या होत्या. ३१ धावांनी भारताचा पराभव झाला. यासोबत भारताचा विश्वचषक स्पर्धेत पहिला पराभव झाला. मात्र यावेळी एक गोष्ट सर्वांकडून दुर्लक्षित झाली. ती म्हणजे फलंदाजी करताना धोनी प्रचंड वेदना सहन करत होता. धोनीच्या अंगठा गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला यष्टीरक्षण करताना आणि नंतर फलंदाजी करताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

सामना संपला तेव्हा धोनीच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. धोनी अंगठा चोखून रक्त थुंकत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एकीकडे टीका करणारे असून, दुसरीकडे चाहते आहेत. चाहते धोनीचा हा फोटो शेअर करत असून क्रिकेटप्रती असणारं समर्पण आणि वचनबद्धता याबद्दल कौतुक करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 1:48 pm

Web Title: world cup 2019 mahendra singh dhoni spitting blood photo goes viral sgy 87
Next Stories
1 सोनाली सामना पहायला गेली अन् मीम्समध्ये चमकली; पाहा व्हायरल मीम्स
2 ऋषभ पंतची जागा बदलू नका, क्लार्कचा टीम इंडियाला महत्वाचा सल्ला
3 VIDEO: ‘इंग्लंड किंवा न्यूझीलंड संघाने आत्महत्या केली तर पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल’
Just Now!
X