04 June 2020

News Flash

World Cup 2019 : विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर धोनीनेच फलंदाजी करावी – डीन जोन्स

संघ चांगली कामगिरी करत असताना बदल अनावश्यक !

महेंद्रसिंह धोनी सध्या त्याच्या संथ खेळीमुळे चांगलाच चर्चेत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांच्या मते, विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी हाच योग्य पर्याय आहे. याचसोबत डीन जोन्स यांनी अष्टपैलू रविंद्र जाडेजाला भारतीय संघात जागा मिळायला हवी असंही मत व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मोईन अलीला खुणावतेय विराट कोहलीची विकेट

“जेव्हा एखादा संघ चांगली कामगिरी करत असतो तेव्हा त्यामध्ये काही बदल करणं मला योग्य वाटत नाही. भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे, मात्र चौथ्या क्रमांकाची जागेवरुन माझी काही ठाम मतं आहेत. महेंद्रसिंह धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास माझी काहीच हरकत नाहीये. याचसोबत रविंद्र जाडेजाला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिल्यास भारताला आणखी एक फिरकीपटूचा पर्याय मिळतो.” जोन्स Star Sports या वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होता.

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात धोनीला संथ खेळीमुळे टीकेचं धनी व्हायला लागलं होतं. विंडीजविरुद्ध सामन्यात धोनीने अर्धशतक झळकावलं खरं, मात्र त्याआधीच्या षटकांमध्ये धोनीने अनेक चेंडू वाया घालवले. साखळी सामन्यात भारतासमोर आता इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये धोनी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2019 4:25 pm

Web Title: world cup 2019 ms dhoni should bat at number 4 says dean jones psd 91
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 World Cup 2019 : मोईन अलीला खुणावतेय विराट कोहलीची विकेट
2 इंग्लंडचा एक पराभव पडू शकतो पाकिस्तानच्या पथ्यावर
3 World Cup 2019 : न्यूझीलंडला उपांत्य फेरीपासून रोखण्यासाठी कांगारु सज्ज
Just Now!
X