सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवला सामोरं जावं लागलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. त्यानंतर विंडिजने विजयासाठी दिलेलं १०६ धावांचं आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत ७ गडींनी विजय नोंदवला. ख्रिस गेलने अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल ठरला षटकारांचा बादशहा

दरम्यान या सामन्यात पाकिस्तानच्या संघाच्या नावावर काही नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

  • १०५ ही पाकिस्तानची विश्वचषक इतिहासातली दुसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी १९९२ साली इंग्लंडविरुद्ध सामन्यात पाकिस्तानचा संघ ७४ धावांवर गारद झाला होता.
  • ३६.२ षटकं राखून विंडीजने हा सामना जिंकला. चेंडू बाकी राखण्याच्या निकषांमध्ये पाकिस्तानचा हा सर्वात लाजिरवणा पराभव ठरला आहे. याआधी १९९९ साली ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १७९ चेंडू राखून मात केली होती.
  • १०५ ही विश्वचषक इतिहासातली २१ वी निचांकी धावसंख्या ठरली आहे.
  • २१.४ षटकात पाकिस्तानचा डाव आटोपला, विश्वचषक इतिहासात झटपट बाद होण्याची पाकची ही पहिली वेळ ठरली आहे. १९९२ साली ७४ धावांवर बाद झालेला असतानाही पाकचा संघ ४०.२ षटकं खेळला होता.
  • याचसोबत २१.४ ही पाकिस्तानची वन-डे इतिहासातली झटपट बाद होण्याची दुसरी वेळ ठरली आहे. याआधी १९९३ साली पाकिस्तानचा संघ विंडिजविरुद्ध १९.५ षटकांमध्ये माघारी परतला होता.
  • ३० जानेवारीपासून पाकिस्तानचा संघ वन-डे क्रिकेटमध्ये एकही सामना जिंकू शकला नाही. पाकच्या पराभवाची ही सर्वात मोठी शृखंला ठरली आहे.
  • नॉटिंगहॅमच्या मैदानात पाकिस्तानने नोंदवलेली १०५ ही दुसरी निचांकी धावसंख्या ठरली आहे.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : गेलच्या झंजावातापुढे पाकिस्तान बेजार, ७ गडी राखून विंडिज विजयी