भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात, रोहित शर्माला तिसरे पंच मायकेल गॉग यांनी संशयास्पद पद्धतीने बाद ठरवलं. केमार रोचच्या गोलंदाजीवर खेळत असताना चेंडू रोहितची बॅट आणि पॅड यांच्यामधून यष्टीरक्षकाकडे गेला. विंडीजच्या खेळाडूंनी रोहित बाद असल्याचं अपील केलं, मात्र पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ते फेटाळून लावलं. तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही Ultra age प्रणालीवर चेंडू स्पष्टपणे बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचं सिद्ध होतं नव्हतं. मात्र तिसरे मंच मायकल गॉग यांनी रोहित बाद असल्याचा निर्णय दिला.

यानंतर रोहित शर्माने फारसा वाद न घालता मैदान सोडण पसंत केलं. मात्र सामन्यानंतर रोहितने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक सूचक फोटो ट्विट करत तिसऱ्या पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

पंचांच्या कामगिरीवर भडकलेल्या चाहत्यांनी या ट्विटवरही रोहितची बाजू घेतली आहे.

विंडीजविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर भारतासमोर रविवारी यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.