News Flash

सरावातून वेळ काढत टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

भारताचा पहिला सामना ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ जूनरोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया साऊदम्पटन शहरात कसून सराव करत आहे. या सरावातून वेळ काढत टीम इंडियाने जवळच्या परिसरातील पर्यटन स्थळाला भेट दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाचे हे खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.

स्पर्धेला सुरुवात होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 1:41 pm

Web Title: world cup 2019 virat kohli and co go paintballing in southampton
Next Stories
1 ICC World Cup 2019 : विश्वविजेत्यांना आव्हान
2 ICC World Cup 2019 : स्वप्नपूर्तीच्या निर्धाराने न्यूझीलंडची वाटचाल
3 फ्री हिट : अज्ञातवास!
Just Now!
X