News Flash

World Cup 2019 : कोहली स्वतःच म्हणतो टीम इंडिया नव्हे तर ‘हा’ संघ बलाढ्य

यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक असेल, याचाही कोहलीकड़ून पुनरुच्चार

विराट कोहली

विश्वचषक स्पर्धा २०१९ साठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला. टीम इंडियाचे सगळे खेळाडू सध्या जोरदार तयारी करत आहेत. या दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. अनेक क्रिकेट जाणकार भारतीय संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मात्र इंग्लंडचा संघ हा सर्वात बलाढ्य संघ असल्याचे सांगत आहे. इंग्लंडमध्ये सर्व संघाच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले.

“यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आहे. त्यांच्या घरच्या वातावरणात ते नक्कीच चांगला खेळ करू शकतात. त्यामुळे इंग्लंडचा संघ हा यंदाच्या विश्वचषकात सगळ्यात बलाढ्य संघ आहे”, असे विराट म्हणाला. “त्याबरोबरच इतर संघदेखील अत्यंत समतोल आहेत. इतर संघांमध्येही चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे हे संघ देखील बलशाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये यंदाची विश्वचषक स्पर्धा ही नक्कीच रंगतदार आणि आव्हानात्मक असणार आहे”, असा पुनरुच्चारही कोहलीने केला.

“इंग्लंडचा संघ गेल्या काही दिवसात ज्या पध्दतीचा खेळ करत आहे, त्यावरून तो संघ लवकरच ५० षटकात ५०० चा टप्पा गाठेल असे वाटते आहे. कारण ५० षटकांचा खेळ असला तरीही इंग्लंडचे फलंदाज पहिल्या चेंडूपासून प्रहार करतात आणि मोठे फटके खेळण्याकडे लक्ष देतात. पण असे असले तरी ही विश्वचषक स्पर्धा आहे. त्यामुळे त्याचे एक वेगळे दडपण असते. त्यामुळे २६० ते २७० चे आव्हानदेखील ३७० ते ३८० धावांचे असल्याप्रमाणे वाटू शकते. स्पर्धेच्या उत्तरार्धात फारसे मोठ्या धावसंख्येचे सामने होतील असे वाटत नाही. काही संघ दमदार कामगिरी करू शकतील, पण स्पर्धेतील दडपण पाहता २५० ही धावसंख्यादेखील आव्हानात्मक असेल”, असेही कोहलीने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 12:35 pm

Web Title: world cup 2019 virat kohli says england will be most strong side in wc
Next Stories
1 World Cup 2019 : भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्यूझीलंडला मोठा धक्का
2 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या जर्सीमधला बदल पाहिलात का??
3 विश्वचषकात केदार जाधवची भूमिका महत्वाची असेल – चंद्रकांत पंडीत
Just Now!
X